उद्धव ठाकरेंवर कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा हल्लाबोल!

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन, कापूस आणि बाजरी या पिकाला बसला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची अशी चिंता आहे. मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादचा दौरा करणार आहेत. मात्र राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गट आमदार अब्दुल सत्तार यांनी या दौर्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लबोल केला असून त्यांना चिंतनाचा सल्ला दिला आहे.


कृषिमंत्री सत्तार म्हणाले,

उद्धव ठाकरेंनी निश्चितपणे रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची पाळी आलीय. पूर्वी ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होते. शेतकरी गोरगरिबांना मदत करायला हवी होती ती न केल्याने ही वेळ आली. शिवसेनेकडील 55 आमदारांची फौज होती. त्यापैकी 40 आमदार शिंदेगटात आहेत. उद्धव ठाकरेंकडे फक्त 15 आमदार राहिलेत. हे लोक आपल्याला सोडून का गेले याचं त्यांनी चिंतन करायला हवे, असे अब्दुल सत्तार म्हणालेत.


मी उद्धव ठाकरे साहेबांच्या औरंगाबाद दौऱ्याचा दिनक्रम पहिला, 24 मिनिटांचा त्यांचा दौरा आहे. या 24 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे किती शेतकऱ्यांशी बोलणार आणि किती पाहणी करणार, आता तुम्हीच बघा असा खोचक टोला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, विरोधीपक्ष आमच्यामुळे रस्त्यावर उतरत आहे. मात्र सर्वच पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे त्यांनी शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटावरून राजकारण करू नयेत. त्यांना काय करायचे ते करावे पण राजकारण करू नये. मी आतापर्यंत 9 जिल्हे आणि 70 तालुक्यात फिरून नुकसानीची पाहणी केली आहे अशी माहिती सत्तर यांनी दिली आहे.

मुंगेरीलाल के हसीन सपने

आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिंदे गटातील 22 आमदार नाराज आहेत, असे आजच्या सामनात म्हणण्यात आले आहे. त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केल. शिंदे गटातील 22 आमदार नाराज म्हणणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असे सत्तार म्हणालेत.