जरांगे पाटलांच्या सभेसाठी एक लाख नागरिक जमा करण्याचे उद्दिष्ट

सिन्नर:- जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी (aantarvali ) येथे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी तब्बल १७ दिवस आंदोलन सुरू होते. आंदोलन काळात राजकीय नेते, पुढारी, सरकारमधील मंत्री यांनी आंदोलन स्थळी जात मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil )यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती.

परंतु जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर उपोषणाच्या १७ व्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आसल्याचे आव्हान दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे राज्यभर सुरू आसलेल्या उपोषण स्थळांना भेटी देत आहेत.

सिन्नर तालुक्यातील पांगरी (sinnar pangari) येथे रविवारी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांची सभा होत आहे. त्यासाठी सुमारे एक लाखांचा समुदाय जमवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी गावोगावी जात बैठका घेऊन मराठा समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. सकल मराठा समाज व समविचारी संघटना यांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटलांच्या सभेचे रविवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आले आहे.

गुरुवारी बारागाव पिंपरी येथे मराठा समाजाचे कार्यकर्ते प्राध्यापक राजाराम मुंगसे, महामित्र दत्ताजी वायचळे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल,राष्ट्रवादी प्रांतीय चिटणीस राजाराम मुरकुटे,भाजप तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, भाजप सेल नाशिक जिल्हा उपाध्यक्ष वामन पवार, कॉ हरिभाऊ तांबे, दत्तात्रय उगले, विजय उगले, दशरथ रोडे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बारागाव पिंपरी येथील विजय कटके, चंद्रशेखर उगले, शशी उगले,योगेश गारोळे, अरुण खांदोडे, उत्तम उगले ,वसंत सहाने, लखन उगले उपस्थित होते.