शिंदेंच्या दसरा मेळाव्याला अमराठी लोक! कुठे चालले नीट सांगताही येईना…

शिवसेनेचा आज दसरा मेळावा असून यंदा दोन दसरा मेळावे होत एक शिंदे आणि एक ठाकरे गटाचा मेळावा आहे. मात्र गटाकडून मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी मोठी तयारी केली गेली असून गर्दी जमवण्यासाठी कोणालाही पकडून आणले जात आहे. पुण्यातून बीकेसीकडे सकाळी एक बस निघाली होती या बसमध्ये काही लोक होते जे अमराठी आहेत. त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. हे लोक बहुतेक पुण्यात काम करणारे बिहारी कामगार असून त्यांना काहीही माहित नसताना शिंदे गट मेळाव्याकडे नेले जात आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला ३ लाख लोक येतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता, त्यात गर्दीसाठी काही पण अशी भूमिका शिंदे गटाची पाहायला मिळतेय.


एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या सखोल अहवालानुसार, पुण्यातून बीकेसीकडे सकाळी एक बस निघाली होती या बसमध्ये काही लोक होते जे अमराठी आहेत. त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. हे लोक बहुतेक पुण्यात काम करणारे बिहारी कामगार आहेत. त्यात एका व्यक्तीने आपण मुंबईला फिरायला चाललो असल्याचे उत्तर दिले आहे.

बसमधील एका परप्रांतीय व्यक्तीने सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी आम्ही निघालो आहोत. यावरुन केवळ एकाच व्यक्तीला आपण कुठे चाललो आहोत हे माहिती होते, पण उरलेल्या इतर जणांना आपण कुठे चाललो आहोत हे माहिती नव्हते, आम्हाला फक्त मुंबईला नेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरुन एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला गर्दीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरुन माणसे आणली गेली आहेत हे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपासून शिंदेंच्या मेळाव्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला गेला असल्याचेही विविध बातम्यांमधून समोर आले आहे. त्यासाठी जेवण-नाश्त्याच्या ऑर्डर्स, बस, रेल्वेच्या बुकिंग असे सर्वकाही करण्यात आले आहे.