स्वराज्य संघटनेच्या राज्य संपर्क प्रमुख पदी करण गायकर यांची नियुक्ती..

नाशिक: संभाजी महाराजांची, स्वराज्य संघटनेच्या राज्य संपर्क प्रमुख पदी करण गायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती माजी खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. २०) मिशन 2024 विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रदेश राज्यकारणी जाहिर केली आहे. या राज्यकार्यकरणीत नाशिकचे करण गायकर यांची स्वराज्य संघटनेच्या राज्य संपर्क प्रमुख पदी वर्णी लागली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती माजी खासदार संभाजीराजे यांनी मिशन 2024 च्या अनुषंगाने प्रदेश राज्यकारणी जाहिर केली. यावेळी, स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे यांनी मिशन २०२४ च्या प्रमुख शिलेदार असा उल्लेख करत, राज्यभरातील स्वराज्य संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख करण गायकर यांची नियुक्ती केली आहे. तसेच सरचिटणीस पदी डॅा. धनंजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य भरात सहा उपाध्यक्ष सह ६० पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारणी सदस्य जाहीर करण्यात आली आहे.

तसेच यामध्ये स्वराज्य संघटनेने पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या पुढच्या काळात राज्याच्या राजकारणात संभाजीराजे व त्यांचे शिलेदार स्वराज्यच्या माध्यमातून सक्रीय होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी नाशिक मधुन स्वराज्य संघटना २०२४ सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे राज्यामध्ये स्वराज्याच्या शिलेदारांना कामाला लागण्याचा सल्ला छत्रपती संभाजी राजेंनी दिला आहे.

यापुढे स्वराज्याचे शिलेदार जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असून स्वराज्याचे विचार हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असणार आहेत. स्वराज्य संघटनेची भूमिका स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार विचार स्वराज्य संघटनेची पंचसूत्री असलेली विचारधारा जनसामान्यांमध्ये पोहोचविण्याची जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांची असेल. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते असलेले करण गायकर यांच्या राज्यसंपर्क प्रमुख पदाची मोठी जबाबदारी मिळाल्याने तसेच डॉ धनंजय जाधव यांची सरचिटणीस पदी निवड झाल्याने सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.