लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं! आठवड्यात दुसरी घटना..

केदारनाथची घटना ताजीच असताना, पुन्हा अरुणाचलप्रदेशात लष्कराच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील तूतिंग भागात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. बचाव कार्यासाठी पथक रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर असून आठवड्यात २ दुर्घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.


गुवाहाटीच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियांग जिल्ह्यातील तूतिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर सिसिंग गाव आहे. या गावात लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली असून बचावकार्य केले जात आहे.

अरुणाचलप्रदेश या घटना वारंवार होताय

अरुणाचलमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही पहिली वेळ नाही. याच महिन्याच्या सुरुवातीलाही अरुणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात ‘चित्ता’ हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला होता. तर दुसरा पायलट जखमी झाला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की, तवांगजवळील फॉरवर्ड एरियामध्ये उड्डाण करणारे आर्मी एव्हिएशन चिता हेलिकॉप्टर 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नियमित उड्डाण करताना क्रॅश झाले. दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले असून तिथे पायलटचा मृत्यू झाला होता.

असा होते ध्रुव हेलिकॉप्टर

ध्रुव हेलिकॉप्टर हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे विकसित आणि निर्मित भारतातील बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. हे भारतीय सशस्त्र दलांना पुरवले जात आणि नागरी आवृत्ती देखील उपलब्ध आहे. हे हेलिकॉप्टर सर्वात आधी नेपाळ आणि इस्रायलमध्ये निर्यात करण्यात आले आणि नंतर लष्करी आणि व्यावसायिक वापरासाठी इतर अनेक देशांनी हे हेलिकॉप्टर आयात केले. हे हेलिकॉप्टर लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. तसेच, ध्रुव हे लढाऊ हेलिकॉप्टर आहे.