जितेंद्र आव्हाडांना अटकजमीन मंजूर; त्यांनी साधला निशाना…

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा भेटला असून विनयभंग प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाकडून आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. यावर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचे सांगितले आणि त्यांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले,

“मला पूर्ण अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं, पूर्ण गर्दीमध्ये एक स्त्री चालत येतेय. मी खासदार श्रीकांत शिंदे यांना बाजूला केलं. त्या बाई समोरुन चालत आल्या. मी बाजूला केलं नसतं तर त्या माझ्या अंगावरच आल्या असत्या. मग मला स्वत:ला सावरण्याची आणि सुरक्षेची कोणतीही संधी मिळाली नसती. मग त्या महिलेने आरोप केला असता की जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले”, असं जितेंद्र अव्हाड म्हणाले.

“बरं झालं देवाने मला काय बुद्धी दिली. मी त्यांना हलक्या हाताने सांगितलं की, बाजूला व्हा. एवढ्या गर्दीत कशाला जाताय? बाजूला व्हा, हे वाक्य व्हिडीओत ऐकू येतंय”, असं आव्हाड म्हणाले.

माझ्या विरुद्ध षडयंत्र

“इतक्या घाणेरडा किळसवाणा प्रकार, प्लॅनिंग करायचा, त्याला वरुन आशीर्वाद मिळवायचे. हा कहर आहे. इतकं बदनामीचं षडयंत्र रचनं आणि एखाद्याला राजकीय आणि सामजिक जीवनामधून उद्ध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचायचं यामध्ये आनंद कसला?”, असा सवाल त्यानी उपस्थित केला.

“मला परवाही अटक केली. त्यावर कोर्टाने जो निकाल दिलाय, अटक करण्याच्या प्रक्रियेतच तुम्ही चुकी केलीय, असे कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे. हे काय चाललंय?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पोलिसांना प्रश्न

“पूर्ण घटना व्हिडीओत आहे. गुन्हा दाखल करण्याआधी तो व्हिडीओ तरी पाहायला होता. कलम 354 दाखल करण्यासाठी काही नियम आहेत. पण काही न वाचता डायरेक्ट गुन्हे दाखल करायचे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पोलिसांवर दबाव

“पोलीस वरुन खूप दबाव असल्याचं सांगतात. हवलदार पासून डीसीपी, सीपीपर्यंत सर्व वरुन दबाव असल्याचं सांगतात. महाराष्ट्राच असं कधी बघितलं नव्हतं. एखाद्या बाईला पुढे करुन महाभारतासारखं नीच राजकारण केलं गेलं. याच शकुनी कोण ते मला माहीत नाही”, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.