नाशिक : दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलावर धारधार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.नाशिकच्या सिडकोतील राज रत्न गार्डन जवळ मित्रासोबत झालेल्या जुन्या भांड्यांची कुरापत काढून एका अल्पवयीन मुलावर तीन-चार जणांच्या टोळक्यांनी प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना भर दुपारच्या सुमारास घडली आहे.हे हल्लेखोर हल्ला करत हातात कोयता घेऊन पाळताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.तर या सीसीटीव्ही मध्ये मारून पळताना आणि हातात कोयता दिसून येतोय.
निखील पार्क अंबड लींक रोड सिडको येथे राहणारे सुनील सोनवणे यांचा १४ वर्षीय मुलगा वेदांत सुनील सोनवणे हा दुपारी एक वाजेच्या सुमारास सिडको तील राजरत्न गार्डन येथे त्याचे मित्र गौरव जाधव आणि वरुन मोकळ यांच्या सोबत गंप्पा मारत असताना त्यांचे ओळखीचे संशयित तीन आरोपी यांनी गौरव जाधव यांच्याबरोबर झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्याच वेळी संशयित सुरज यानी त्याच्या जवळ असलेला लोखंडी कोयत्याने वेदांत याच्या डोक्यावर, डाव्या कानावर ,पाठीवर वार करून गंभीर जखमी केले.
जखमी युवकाला उपचारार्थ त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणी संशयित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.असे असले तरी दिवसा ढवळ्या एका तरुणावर धार धार शास्त्राने प्राण घातक हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात खाकीचा धाक कमी झाला आहे कि काय असा प्रश्न नागरिक करत असून पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी कठोर पाऊले उचलली पाहिजे अशी मागणी सध्या नाशिककर करत आहे.