नाशकात पोलीस ठाण्यासमोरच हल्ला; धक्कादायक कारण समोर

नाशिक : लिव इन रिलेशनशिप मधून अनेक गुन्हेगारी घटना घडल्याचे आपण पाहिले आणि ऐकले आहे. दरम्यान पुन्हा एक असाच प्रकार समोर आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मधून पुन्हा एकदा गुन्हा घडल्याची घटना समोर आली आहे. तर नाशिक मधून ही घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्या समोरच लिव्ह इन पार्टनर ने मुलीसह आईवर हल्ला केला करत स्वतःला देखील जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह नाशिक मध्ये देखील खळबळ उडाली होती. आधी या पुरुषाने अशाप्रकारे हल्ला का केला असाप्रश्न उपस्थित झाला. मात्र त्यानंतर घटनेमागील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल बारा वर्षांपासून महिला आणि हल्ला करणारा इसम लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. या इसमाने महिलेसह तिच्या मुलीवर प्राणघात हल्ला केला. त्यानंतर स्वतःवर देखील वार करून घेतले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडल्याने पोलिसांचा धाक उरलाय की नाही..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस ठाण्यासमोर एका महिलेसह तिची मुलगी उभी होती. इसमाने त्या ठिकाणी येत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर हल्ला चढवला. या सर्व घटनेनंतर तपास केला असता ते दोघे बारा वर्षांपासून लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे समोर आले. प्रियकरा सोबत या महिलेचे वाद झाले होते. त्यावरून महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आली आणि तेव्हा हा सर्व प्रकार घडला.

महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर प्रियकर देखील तिथेच आला. त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याच्याकडे असलेला चाकू काढत महिलेसह मुलीवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली आणि नंतर स्वतःवर देखील वार करून घेतले. हा संपूर्ण प्रकार घडतअसताना पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रियकराने महिलेला एक फ्लॅट घेऊन दिला होता आणि त्यावरून वाद झाला. वाद वाढत गेला, प्रकरण चिघळलं त्यामुळे महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस ठाण्यासमोरच हा सर्व प्रकार घडला. या घटनेमुळे लिव इन रेलेशन मध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.