मित्राला मिठी मारली म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरांतील वाढती गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देणारी ठरते आहे. रोज छोट्या मोठ्या गोष्टींवरून जीवे मारणे म्हणजे शुल्लक बाब झालेली दिसून येते. मित्राला मिठी मारली म्हणून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

आडगाव परिसरात ही घटना घडली असून वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी का मारली हे विचारताच तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. रात्री (दि.१२) रोजी मध्यरात्री घटना घडली.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एकीकडे वाढत्या गुन्हेगारी संदर्भात नाशिक पोलीस कारवाई करत असताना सातत्याने होणाऱ्या घटनांनी नाशिक हादरात आहे.