औरंगाबादचे झाले ‘छ्त्रपती संभाजीनगर’, नाशकात मोठा जल्लोष..!

नाशिक : औरंगाबाद शहराचे नाव ‘छ्त्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने राज्यभरात अनेक ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे. शासनाच्या या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. दरम्यान नाशिकमध्ये देखील हा आनंद पाहायला मिळाला आहे. औरंगाबाद शहराचे नाव ‘छ्त्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने नाशिकमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने जल्लोष करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने मंजुरी ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ या नावांना मंजुरी दिल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. अत्यंत आनंदाचे वातावरण या य्हीकानी बघयला मिळाले. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यकर्त्यांनी पेढे वाटत, फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान यावेळीही अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व गहाण ठेवल्याची टीका करण्यात आली.

शहराचे नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर..!

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याचा हा मुद्दा अनेक दिवसांपासून सुरु होता. दरम्यान आता या शहरांचे नावे बदलण्यास केंद्र सरकारने देखील हिरवा कंदील दिला आहे. अशात औरंगाबाद शहराचंच नव्हे तर आता जिल्ह्याचंही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने यासंबंधीचं राजपत्र नुकतंच जारी करण्यात आले आहे. दरम्यान केवळ शहराचं नाव बदलल्याचा उल्लेख करण्यात आला असून जिल्ह्याचं नाव कधी बदलणार, यावरून देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून सवाल करण्यात आले. त्याला उत्तर देत ‘आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.’ असे फडणविसांनी ट्वीट करत सांगितले होते.

‘महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही,’ असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.