नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथील रहिवासी असलेल्या संशयित आरोपी दादा पंडित गायकवाड याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून, पीडित मुलीने संशयित आरोपी गायकवाड याच्या विरोधात मुल्हेर पोलिश स्टेशनला फिर्याद दिली असता पोलिसांनी त्याला अटक केली असून मालेगाव च्या न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
संशयित पंडित गायकवाड याने मुल्हेर येथील एका अल्पवयीन मुलीवर (वय १४) लग्नाच्या बहाण्याने अनेकवेळा बलात्कार केला होता. नंतर त्याने लग्न करायला नकार दिल्यानंतर पीडित मुलीने मुल्हेर येथील पोलिस उपनिरीक्षक संजय वाघमारे यांच्याकडे तक्रार दिली.
Read Also: २ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असल्यास तडीपारीसह मोका लागणार
मुल्हेर येथील सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी फरार गायकवाड (२० वर्षे) याला अटक करून मालेगावच्या न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, पोलिस नायक योगेश क्षीरसागर, कॉन्स्टेबल शरद भगरे, जीतू पवार, रवींद्र कोकणी करीत आहेत.