नारायण राणेंना बाईनं पाडलं बाईनं; संजय राऊतांकडून अजित दादाचं कौतुक तर नितेश राणेंकडून खोचक टोले

शिवसेनेत बंडखोरी करणारे पुन्हा कधीही निवडून येत नाही याची आठवण करून देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आताचे केंद्रीय मंत्री नारायण यांना त्यावेळी एका बाईने निवडणूकीत पाडल्याचे मिश्किलपणे म्हणाले आहेत. हा व्हिडिओ सध्या राज्यभर व्हायरल होत आहे तसेच खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ ट्विट करत अजित पवारांचे कौतुक केलाय, यावर आता भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे, तसेच तसेच त्यात त्यांना अनेक टोले लावण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना पक्षात बंडाबाबतची आठवण करून देताना अजित पवार जुन्या आठवणी काढतात, ते म्हणतात कि, ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडली ते सर्व निवडणुकीत पडले. अगदी छगन भुजबळ यांच्यापासून ते नारायण राणे यांच्यापर्यंत सर्व नेते निवडणुकीत पडले. नारायण राणे तर २ वेळा पडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा मुंबईतील बांद्र्याच्या निवडणुकीत पडले. त्यावेळी तर एका महिलेने त्यांना पाडलं. बाईनं पाडलं बाईनं असं’, असे आपल्या खास शैलीत अजित पवार म्हणाले आहेत.

त्यावर आता अजित पवारांना नितेश राणे यांनी ट्वीटरवर प्रतिउत्तर दिले आहे, ते म्हणाले, “अजित दादा मोठे नेते..पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा.. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे..
राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले..शाम सावंत सोडून..माहिती असुदे दादा..बस या वेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा..” असे नितेश राणे खोचकपणे म्हणाले आहेत.

“गेल्या वेळी बिचारा.. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला..म्हणून ते काही होत का बघा..राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री.. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले..आपण काय फक्त भावी मुख्यमंत्री च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात..तुमचा आवडता….टिललु 😅” अश्या आशयाचे ट्वीट करत नितेश राणे यांनी अजित पवारांना टोले लगावले आहेत.

संजय राऊतांकडून कौतुक

संजय राऊत यांनी दादांच्या या फटकेबाजीचा व्हीडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर करत दादाचं कौतुक केले आहे, “दादा म्हणजे कमाल की चीज! नेता असाच असतो, एकदम मोकळाढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.