Home » आत्महत्येपूर्वी जावयाचे व्हाट्सअँप स्टेटस ‘बेटा आय मिस यु’

आत्महत्येपूर्वी जावयाचे व्हाट्सअँप स्टेटस ‘बेटा आय मिस यु’

by नाशिक तक
0 comment

जळगाव । प्रतिनिधी
पत्नी आणि सासरच्यांचा जाचाला व मानसिक छळाला कंटाळून जळगाव जिल्ह्यात ३२ वर्षीय जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमोल प्रकाश धनगर (रा. शिरसोली प्र. न.) असे या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान आत्महत्येपूर्वी या तरुणाने ‘सासू आणि सासरे यांच्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. ते मला सतत त्रास देताता आणि फोनवरुन धमकावतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. माझ्या बकऱ्या विकून येतील ते पैसे मुलगा आणि मुलीच्या नावावर करा, हीच माझी शेवटची इच्छा आहे, असे स्टेटस ठेवत गळफास घेत आयुष्य संपविले आहे. तसेच आपल्या लहान मुलाविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

यामध्ये ‘आय मिस यू बेटा’ असं लिहिल्याची माहिती आहे. अमोलची पत्नी गेल्या एक ते दीड महिन्यांपासून दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली आहे. रविवारी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास अमोलचे वडील प्रकाश धनगर घरी आले असता अमोल त्यांना छताच्या हुकाला दोरी बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळला.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिस शेख यांनी पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर अमोलचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!