बापासोबत कटकट मुलाला भोवली! २० वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या..

मुलाचे आणि बापाचे सतत भांडण व्हायचे. सावत्र मुलाच्या सततच्या भांडणाच्या कटकटीने वैतागून बापाने मुलाचा खून करून ड्रममध्ये टाकले आणि कुणालाही कळू नये म्हणून त्या भोवती सिमेंटचे प्लास्टर केले. ही धक्कादायक आणि तेवढीच क्रूर घटना पंजाबच्या लुधियानामध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणाच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयीताचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना परिसरात विवेकानंद मंडल उर्फ सपू मंडल नामक व्यक्ती राहत होती. त्याच्या बायकोच नाव सविता असे होते. सविताचे विवेकानंद सोबत दुसरे लग्न झाले होते. विवेकानंद सविताचा दिर लागत होता. मात्र नंतर त्यांनी लग्न गाठ बांधली. सविताला आपल्या पहिल्या पत्नीपासून एक २० वर्षीय पियुष नामक मुलगा होता. मात्र पियुषचे व विवेकानंदचे कधी पटलेच नाही. विवेकानंदचा स्वभाव त्याच्या मुलाला पटत नव्हता, त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे.

एक दिवस मात्र अचानक पियुष बेपत्ता झाला. त्याची सर्वत्र शोधा शोध करण्यात आली. मात्र त्याचा कुठेही पत्ता लागेना. म्हणून सविताने नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बराच वेळ गेला मात्र मुलाचा कोठेही शोध लागला नाही.

काही दिवसानंतर परिसरात मोठी दुर्गंधी येऊ लागली. ती दुर्गंधी कोठून येत आहे याची शोधाशोध सविताने केली. घराच्या आवारातच तिला एक ड्रम भोवती नवीनच प्लास्टर केलेले दिसले आणि त्यातून भयंकर दुर्गंधी येत होती. तिने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी प्लास्टर तोडून ड्रम मध्ये बघितला असता पियुषचा मृतदेह त्यात आढळून आला.

पुढे पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर आले, आरोपी विवेकानंद याचे मुलगा पियुषसोबत वारंवार भांडण व्हायचे. पियुषला विवेकानंदचे वागणे पसंत नव्हते. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींवरून दोघांमध्ये नेहमीचा वाद व्हायचा. मुलाच्या या सततच्या कटकटीला कंटाळून विवेकानंदने मुलाला कायमचा संपवण्याचा प्लान आखला. त्यातूनच त्याने हत्येची संपूर्ण तयारी केली. पूर्ण नियोजन करून त्याने हा कट रचला होता.

मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याचे हातपाय बांधले आणि त्याला ड्रममध्ये पॅक केले. मुलाच्या आईने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.