मोठी बातमी..! सुप्रिया सुळे यांच्यानंतर अजित पवार देखील थोडक्यात बचावले

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार एका अपघातातून बालबाल बचावले आहे. एका हॉस्पिटलच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लिफ्ट असताना अचानक लिफ्टचा अपघात झाला. चौथ्या मजल्यावरून ही लिफ्ट खाली धडकन खाली कोसळली. अजित पवार यांच्यासोबत यावेळी जेष्ठ डॉ. हर्डीकर देखील होते. हर्डीकर यांना थोडी दुखापत झाली आहे. मात्र अजित पवार हे या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. १४) पुणे येथील हॉस्पिटलचे उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी घडली आहे. आज एका कार्यक्रम प्रसंगी अजित पवार यांनी आपबीती सांगितली आहे.

तर झाले असे की, काल शनिवारी पुणे येथे दोन हॉस्पिटलचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यातील दुसऱ्या हॉस्पिटलच्या उदघाटनावेळी अजित पवार असलेल्या लिफ्टचा अपघात झाला. हा अपघात मोठा होता. लिफ्ट थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये अजित पवार, जेष्ठ डॉ. हर्डीकर आणि एक सिक्युरिटी गार्ड होते. मात्र या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेबद्दल कोणालाही काही माहिती न कळू देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.

मात्र आज एका कार्यक्रमात बोलताना आपल्यावर घडलेल्या या प्रसंगाबद्दल अजित पवार सांगितले, वाचा त्यांच्या शब्दांत हा थरारक प्रसंग,

अजित पवार म्हणाले, डॉक्टरांच्या आग्रहाखातर तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेलो. पण, लिफ्ट वर जाईना, काही वेळानं लाईट गेली. अंधार गुडूप…
काही कळायच्या आतच चौथ्या मजल्यावरून लिफ्ट धाडदिशी खाली आली. खोटं नाही सांगत आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम होता. मला भीती माझ्यासोबत असलेल्या असलेल्या हर्डीकर डॉक्टरांची होती. कालच वडिलांची पुण्यतिथी होती आणि मला काही झालं असतं तर माझ्याही श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता असे पावर मिश्किलपणे म्हणाले, यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.