मोठी बातमी..! कॉंग्रेस मविआतून बाहेर पडणार? पटोलेंचा सूचक इशारा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावरून काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तिन्ही पक्षांमध्ये फूट पडण्याची चिन्ह दिसत आहेत. ‘महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, ना कोणतीही पर्मनंट आघाडी नाही. विपरीत परिस्थिती एकत्र आलेले पक्ष आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. या मुले आता राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीमधून काँग्रेस भर पडणार कि काय?अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली.यावेळी ते बोलत असताना महाविकास आघाडीच्या भविष्यावरही भाष्य केलं आहे पटोले म्हणाले कि.’पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. आमची आघाडी विपरीत परिस्थिती मध्ये झाली आहे . आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे.नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, म्हणत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीतुन बाहेर पडण्याचे संकेत दिले आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्यानंतर, आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला हवे होते. मात्र शिवसेने अंबादास दानवे यांची निवड करून नियुक्तीचे पत्र दिले आहे.त्यामुळे काँग्रेस नाराज असल्याचं दिसून येत आहे तर काँग्रेसच्या नेत्यांकडूनही
नाराजीच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. असे असताना आता नाना पटोले यांच्या या भाष्या नंतर आता राजकीय वर्तुळत चर्चा रंगू लागल्या असून महाविकास आघाडीत फूट पडते कि काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.