मोठी बातमी..! नाशिक आदिवासी विकास भवनाला घेराव

नाशिक : आदिवासी विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले असून मोठ्या संख्येने आदिवासी विकास भवनाला त्यांनी घेराव घातला आहे. राज्याचे मुख्य आदिवासी विकास भवन असलेले ‘नाशिक’ येथील आदिवासी विकास भवनाला आज सोमवारी (दि. २३) सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी घेराव घातला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक झाले असून जवळपास 400 ते 500 च्या संख्येने हे विद्यार्थी उपस्थित आहे. ते हातात विविध फलक घेऊन शांतपणे आपल्या मागण्या मांडत आहेत. अखिल भारतीय महाराष्ट्र आदिवासी विकास परिषद चे युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा त्यांचा मानस आहे.

आदिवासी विकास भवनाला या विद्यार्थ्यांनी घेराव घातला असून मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत. पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तसेच डीबीटी लागू करण्यासाठी, होस्टेलमध्ये वाढीव जागा मिळण्यासाठी तसेच अनेक विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा या विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड स्पष्ट दिसत असून आता हे विद्यार्थी आक्रमक झाले आहते. त्यांनी आपल्या नयन हक्कासाठी एल्गार पुकारला असून आपल्या मागण्यांसाठी थेट राज्याचा मुख्य आदिवासी विकास भवनाला त्यांनी घेराव घातला आहे. आपल्या हातात विविध मागण्यांच्या विविध फलक, बॅनर घेऊन हे विद्यार्थी आपले म्हणणे मांडत आहेत.

या आहेत मुख्य मागण्या

पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळावा

DBT लागू करण्याची मागणी

हॉस्टेलमध्ये वाढीव जागा मिळायला हव्यात

या महत्वाच्या मागण्या असून आणखी मागण्यांसाठी जवळपास 400 ते 500 च्या संख्येने विद्यार्थ्यांनी विकास भावनाला घेराव घातला आहे.