मोठी बातमी..!महापालिका निवडणुकांचा बार दिवाळीनंतर उडणार?, शिंदेनी कंबर कसली..

अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांचा बार हा दिवाळीनंतर उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांकडून गणेशोत्सवाचा निमित्ताने पक्ष मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकांच्या दृष्टीने कामे करत आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुका दिवाळी नंतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात नव्या समीकरणांची नांदी

राज्यात महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्यात जवळीकता वाढताना दिसत आहे. भाजप तसेच शिंदे गटाच्या देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे तीन पक्ष महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेला एकटे पडून भाजपने आणखी २ नेत्यांचे म्हणजेच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे बळ वापरात मुंबई महापलिका १५० प्लस जागा घ्यायची असे टार्गेट ठरवले आहे.

तसेच शिवसेना देखील मविआमध्ये असून संभाजी ब्रिगेड सोबत नुकतीच शिवसेनेने युती केली आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील स्थानिक पातळीवर बळ मिळाले असून निवडणुकांत कोण कोणाला धोबीपछाड देते हे पाहणे महत्वाचे ठरते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी कसली कंबर

महापालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांनी देखील कंबर कसली असून त्यांचा गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेनच्या पदाधिकारी तसेच नेते यांच्या सोबत भेटीगाठी सुरु असून आपला गट आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. तसेच मुंबई महापालिका शिंदे गट आणि भाजप सोबत लढणार असे काल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले आहे. अद्याप मनसे सोबत कुठल्याही प्रकारची अधिकृत, अनधिकृत घोषणा झाली नाहीये.