मोठी बातमी..! तांबेना भाजपाचा पाठिंबा मिळणार का? नाशकात विखे पाटलांच मोठं वक्तव्य

by : ऋतिक गणकवार

नाशिक : दिवसेंदिवस नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात सत्यजित तांबे आणि भाजपच समीकरण काय याबद्दल अजून अधिकृत अशी स्पष्टता प्राप्त झाली नाहीये. त्यात आता भाजपचे, महसूलमंत्री राधाकृष्णन विखे-पाटील यांनी त्याबाबत एक विधान केले आहे. सत्यजि तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्णन विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सत्यजीत तांबे यांच्यांबाबत बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी असे थेट आव्हान त्यांनी केले आहे. आज नाशकात होत असलेल्या कृषी मोहोत्सव प्रसंगी विखे-पाटील आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असेलेले डोंगरेवस्तीगृह येथे कृषी महोत्सव भरवण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्णन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतीमाल विकावा लागते, बाजार समितीने साठवणूककडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. पणन व्यवस्था सक्षम झाली नाही, हे दुर्दैव आहे, कृषी पणन याची सांगड घातली पाहिजे, दोन्ही खाते दोन वेगळ्या लोकांकडे असतात अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाना पटोले यांना जोरदार प्रतिउत्तर

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काल नाशिकमध्ये येत भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाकडे पदवीधरला उमेदवार नाही मिळाला, भाजपचे नाक का काटले? असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आता विखे-पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

ते म्हणले, नाना पटोले यांनी आपल्या नाकाला हात लावून बघायला पाहिजे राज्यात, काँग्रेसची काय अवस्था आहे बघायला पाहिजे असा प्रतिहल्ला विखे-पाटील यांनी चढवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांवर विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला ते सरकार जनतेच्या मनातील नव्हते, आताचे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही असे ते म्हणाले.