Home » फेसबुक लाईव्ह केले म्हणून भाजप तालुकाध्यक्षाला मारहाण

फेसबुक लाईव्ह केले म्हणून भाजप तालुकाध्यक्षाला मारहाण

by नाशिक तक
0 comment

औरंगाबाद । प्रतिनिधी

एखाद्याच्या पाठीमागे दादा भाई चा हात असला तो शिरजोर होत असतो. मग कुणावरही आपला हात चालवत असतो. असाच प्रकार औरंगाबाद मध्ये समोर आला आहे. एका मंत्र्याच्या भावाने दुसऱ्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

औरंगाबाद येथील भाजप तालुका उपाध्यक्षाने काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्ह करत रस्त्याच्या कामाची पोलखोल केली होती. याचा राग मनात धरून राज्यमंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांच्या भावाने त्यास मारहाण केली आहे. रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह का केले म्हणत दांड्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भुमरे यांच्या मतदारसंघातील धुळे-सोलापूर महामार्गापासून असणाऱ्या रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात बोगस रस्त्याबाबत भाजप तालुका उपाध्यक्ष रणजीत नरवडे आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे हे फेसबुक लाईव्ह करत असल्याच कळताच राजू भुमरे आपल्यासोबत काही लोकांना हातात लाठ्या-काठ्या घटना स्थळी दाखल झाले. फेसबुक लाईव्ह संपताच भुमरे यांनी नरवडे यांना शिवीगाळ करत हातातील दांड्याने बेदम मारहाण केली.

याबाबत तक्रार देऊनही पाचोड पोलीस गुन्हा नोंदवून घेत नसल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे यांनी केला आहे.असे आहे प्रकरणरोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!