गणपती विसर्जनाच्या दिवशी मुख्य मिरवणूक मार्गावरील वाहतूक व्यावस्थेत बदल

नाशिक:- दरवर्षी गणेश उत्सव(nashik ganesh festival) मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. गणपती बाप्पा विराजमान होण्यापासून ते विसर्जनापर्यंतच्या १० दिवसांच्या कालावधीत अनोख्या पद्धतीचे देखावे, आरास प्रदर्शित केले जातात. गणपतीचे दहा दिवस सगळीकडे चैतन्यमय वातावरण असते. गणेश भक्तांमध्ये या दिवसांतिल एक एक क्षण हा महत्वाचा असतो.

मुंबई-पुण्या पाठोपाठ नाशिक मध्येही गणेश मंडळांकडून या वर्षी आकर्षक असे देखावे साकारण्यात आले आहे. संपूर्ण नाशिक शहरात नाशिकचा राजा, मानाचा राजा, चिंतामणी असे विविध गणेश मंडळांकडून देखावे सादर करण्यात आलेले आहे. आपण केदारनाथ(kedarnath tempale nashik) ला जावं अशी अनेक वयस्कर लोकांची इच्छा असते परंतु वयानुसार त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. यावर्षी नाशिक शहरातील रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरा समोर केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना केदारनाथ(kedarnath in nashik) चा अनुभव हा नाशिकमध्ये आला आहे.

नाशिक शहरातील भव्यदिव केदारनाथ मंदिर बघण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहे. या मंदिरात केल्यानंतर आपण प्रत्यक्ष मंदिरात असल्याचं भावकिना अनुभूती येत असते. दररोज रात्री हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे शेवटचे ३ दिवस राहिल्याने शहरातील देखावे बघण्यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. गुरुवारी २९ मार्च ला गणपती विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील मुख्य मिरवणूक मार्गासह परिसरातील इतर ठिकाणी विसर्जन पाहणी करत वाहतूक मार्गात बदल करत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे

पारंपारिक मिरवणूक मार्गावरील वाकडी बारव चौक,मंडई जहांगीर मशीद,दादासाहेब फाळके रोड, फुले मार्केट, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट सांगली बँक, सिग्नल महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल,मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक,परशुराम पुरिया रोड, कपालेश्वर मंदिर, भाजी बाजार, म्हसोबा पटांगण, अशी मिरवणूक निघणार असल्यामुळे या वाहतूक मार्गात वाहतूक मार्ग बंद राहणार आहे.

असा आहे पर्यायी मार्ग

सिटी लिंक बस सकाळी दहा ते मिरवणूक संपेपर्यंत पंचवटी एसटी डेपो क्रमांक दोन सिटी लिंक रोड तपोवन निमानी बस स्थानक पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या बस पंचवटी डेपो इथून सुटतील तसेच ओझर दिंडोरी पेठ(dindori prth) इथून बस आणि वाहने आडगाव नाका कन्नमवार पूल पुढे द्वारका सर्कल मार्गे नाशिक रोड व इतरत्र जातील पंचवटीकडे येणारी सर्व वाहने देखील द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील आर के येथून सुटणाऱ्या बस शालिमार येथून सुटतील.