“आमच्या पप्पांनी गणपती आणला” फेम साईराज केंद्रे कोण आहे पहा..

बीड : गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन पोहचला आहे. या दिवसांत गणपती मंडळाकडून विवध प्रकारचे देखावे आपल्याला पाहायला मिळत आसतात. त्याची तयारी ही काही महिन्यांपासून करत आसतात गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ ही प्रत्येकाला आसते. अशाच प्रकारची बाप्पा च्या आगमनाची ओढ आसलेल्या एका चिमुकल्याचा मागील आठवड्याभरापासून सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चार वर्षाचा चिमूकला “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावर एक्टिंग करताना दिसत आहे. हे पाहून तुम्हाला हा मुलगा नेमका कोण आहे? आणि तो . रातोरात कसा स्टार झाला असे एक ना अनेक प्रश्न पडले असेल.

ह्या व्हिडिओत दिसणाऱ्या चिमुरड्याच नाव साईराज केंद्रे असून तो फक्त चार वर्षाचा आहे. हुशार आणि चलाक बुद्धी असणाऱ्या साइराजने गणपती बाप्पाच्या गाण्यावर एक रिल्स बनवली आणि ही रिल्स काही तासातच लाखो लोकांपर्यंत पोहचली आणि साईराज रातोरात स्टार झाला.

या आधीही साइराजने अनेक गाण्यांवर वेगवेगळ्या स्टाईलचे भन्नाट व्हिडिओ बनवले आहेत. ते पाहूनही साईराज च कौतुक होत आहे . आगदी लहान असल्यापासूनच साईराज कलाकारी करतो. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्या रिल्स बनवायला सुरुवात केली. आणि आता साईराज आणि एक्टिंग नात एवढं घट्ट झालं आहे की तो एखाद्या अभिनेत्यासारखं कॅमेरा समोर येतो आणि काही क्षणात रिल्स बनवतो. तर साईराज ला मोठं होऊन रितेश देशमुख सारखा अभिनय करायचा आहे असही तो सांगतो.