मुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींना दिले आश्वासन; लवकरच होणार गड-किल्ल्यांचा..

राज्यातील गडकिल्ल्यांची दुरावस्था झाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. राज्यातील  गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला असून अश्या अनेक मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्र्यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांचा मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

शिवप्रेमींना संबोधत मुख्यमंत्री म्हणले, तुमचा आग्रह होता की मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून भेट द्यावी म्हणून मी तुमच्या भावना जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपला इतिहास आणि आपली परंपरा आहे. तो इतिहास टिकवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असे सांगत लवकरच या किल्ल्यांच्या संदर्भात प्राधिकरण महामंडळ स्थापन करून आजपासूनच मी काम करण्याच्या सूचना देत असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. 

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवी संकल्पना उदयास

मुख्यमंत्री म्हणाले, “लवकरच दुर्गा मित्र म्हणून आपण नवीन संकल्पना सुरू करणार आहोत. जेणेकरून गड-किल्ल्यांच्या आसपासच्या परिसरातील तरुणांना मदत होईल आणि त्यांना देखील आपण शासनाच्या वतीने मदत करू. त्यामुळे या गडकिल्ल्यांच्या संदर्भात तातडीने काम करण्याच्या सूचना मी संबंधित विभागांना देत आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आंदोलकांना आश्वसान दिले. 

शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपला इतिहास आणि आपली परंपरा आहे. त्यामुळे तुमची काही मागणी आहे ती नक्की विचार करण्यासारखी आहे. लवकरच या किल्ल्यांच्या संदर्भात प्राधिकरण महामंडळ स्थापन करून आजपासूनच मी काम करण्याच्या सूचना देत आहे. हे सरकार किती जलद गतीने काम करत आहे हे आता आपल्या लक्षात आले असेल. मी तातडीने या संदर्भात प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देत आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.