मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल..!

शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून सतत हल्लाबोल केला असून ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून सरकारवर सडकून टीका केली जातेय. आता याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. तसेच ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचे सांगत, त्यांनी ठाकरे गटाला आत्मपरिक्षण करण्याचे, आत्मचिंतन करण्याचा सल्ला ही दिला आहे.



सध्या राज्याचे राजकारण अधिक तापलेले असून विरोधक सरकारला सतत कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असते. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील पुढील काही महिन्यांतच शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्यायचे भाकीत केले होते. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील सरकार पडणार असे विधान सातत्याने करत असतात.

मुख्यमंत्री म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घडलेले मोठं-मोठे शिवसैनिक आज आपल्यासोबत आहेत. गजानन कीर्तिकर, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ असे ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचे सांगत, त्यांनी ठाकरे गटाला आत्मपरिक्षण करण्याचे, आत्मचिंतन करण्याचा सल्ला ही दिला.”

“सीमाप्रश्नावरुन वातावरण तापलेले असताना हा प्रश्न धसास लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमाप्रश्नावर राज्य सरकार स्वस्थ बसणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.”

“राज्यात प्रत्येक कॅबिनेटमध्ये एक दोन जलसिंचन योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र जलसिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. निर्णय घ्यायाला हिंमत लागते”, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

यावेळी भूंकपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडविल्याचा दावा त्यांनी केला. आतापर्यंत एक-दोन पिढ्यांना लाभ मिळत होता. आपल्या सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या पुढच्याही पिढ्यांना लाभ देण्याची घोषणा त्यांनी केली