मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंविरोधात तुफान बॅटिंग!

सध्या राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे रणकंदन सुरु आहे. त्यातच दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरच असतात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष करत त्यांचावर घणाघात चढवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर असून आज मुक्ताईनगर येथे जाहीर सभा झाली. यासभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे प्रहार केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

 गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झाला, पण हे विरोधकांना चालत नाही. मात्र जनेतेने आम्हाला स्वीकारल आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.

रात्रंदिवस काम करायला तयार आहे. अडीच वर्षात जेवढी कामे झाली नाही; तेवढी कामे गेल्‍या अडीच महिन्‍यात केली आहेत. अजून दोन वर्ष बाकी आहेत. यामुळे विरोधक आता घाबरले आहेत. मी फिरत असल्‍यामुळे तेही फिरू लागले आहेत; असा निशाणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर साधला आहे. 

आम्हाला जनतेने मान्य केले

बाळासाहेब व नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडणूक लढलो. अनेक लोकांनी सांगितले, की आमच्‍या मतांचा अनादर केला आहे. धोका दिला, गद्दारी केली. पण गद्दार कोण? असा अप्रत्‍यक्ष सवाल देखील मुख्‍यमंत्री शिंदे यांनी केला. भाजप– शिवसेना युतीला जनतेने स्‍वीकारले आहे. ते अडीच महिन्‍यात दिसतेय. आरोप होत आहेत, परंतु आम्‍ही कामातून उत्‍तर देवू. मतदारांशी खेळखंडोबा करत नाही. त्‍यांना न्‍याय देवून मत मागणार असल्‍याचे म्‍हणाले.