मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर ! मनमाडच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे करणार उद्घाटन

नाशिक : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. मनमाड नांदगाव मतदार संघात करंजवण-मनमाड पाणी योजना प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच मनमाड येथे होणाऱ्या इतरही कार्यक्रमांना त्याची उपस्थिती राहणार आहे.

नाशिकच्या मनमाड-नांदगाव मतदार संघातील विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या ग्रामीण दौऱ्यावर असणार आहे. नांदगाव मतदारसंघातील शिवसृष्टीची भूमिपूजन, एमआयडीसीची अधिकृत घोषणा, फिरते दवाखाने, घरपोच सेतू कार्यालय, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार उपस्थित असणार आहे.

करंजवण- मनमाड पाणी प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. करंजवण- मनमाड पाणी प्रकल्पामुळे मनमाड मतदार संघातील पाणी प्रश्न सुटणार असून गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड मधील नागरिकांना जे पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे ते संकट दूर होणार आहे. या प्रकल्पाबद्दल म्हणायचे झाले तर ३११ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प आहे. आमदार सुहास कांदे यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान आता हा प्रकल्प सत्यात उतरणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होईल.

दरम्यान या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित राहणार आहे.

मनमाड साठी प्रकल्प महत्वकांक्षी

टंचाईग्रस्त मनमाड साठी हा प्रकल्प महत्वकांक्षी मानला जात आहे. ३११ कोटींच्या करंजवण-मनमाड पाणी योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. महर्षी वाल्मिक स्टेडियमवर पन्नास हजार क्षमतेच्या भव्य आणि आकर्षक सभा मंडप उभारण्यात आला असून या ठिकाणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगमन करतील. त्यानंतर हा भूमिपूजन सोहळा पार पडेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि अन्य मंत्री देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

मनमाड शहराला करंजवण-मनमाड पाणीपुरवठा प्रकल्प अत्यंत उपयुक्त मानला जात आहे. या प्रकल्पासाठी प्रकल्प समितीने मान्यता दिली होती. मंत्रालयात या योजनेच्या मंजुरीसाठी बैठक पार पडली होती. त्यानंतर पाणीपुरवठा योजनेबाबत सर्व आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करून ती योजना प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या कामी शासन स्तरावर सादर करण्यात आली. यानंतर समितीने प्रकल्पाला मान्यता दिली. त्या संदर्भात प्रकल्प समितीची मंत्रालयात बैठक पार पडली होती. महाराष्ट्र सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत मनमाड पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी मंत्रालयात ही बैठक २०२२ साली झाली होती. मनमाड भीषण पाणी टंचाईला सामोरे जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. अखेर या प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. ही मनमाड करांसाठी अत्यंत चांगली बातमी मानली जात आहे.