चिमुकल्यांच्या आंदोलनाला यश; नाशिकमधील ‘ही’ शाळा होणार पुन्हा सुरू !

नाशिक: काल नाशिक मध्ये इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सुमारे 40 ते 45 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेवर बकऱ्या घेऊन जात ‘दप्तर घ्या बकऱ्या द्या’ मोर्चा घेऊन जात अनोख आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांचे आंदोलन चांगलेच लक्षवेधी ठरले होते. अतिदुर्गम भाग असलेल्या दरेवाडी येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. जिल्हा प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली असून दरेवाडीतील शाळा पुन्हा होणार सुरू होणार आहे.

भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या इगतपुरी येथील काळुस्ते गावच्या दरेवाडीची दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद केल्याने येथील विद्यार्थानां इतरत्र शाळेत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शाळा लांब पडत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः लढा उभारला शाळा नसल्याने व नुकसान होवु नये म्हणुन श्रमजीवी संघटनेच्या वतीने स्थानिक गटशिक्षण अधिकारी कार्यालयात देखील शाळा भरवुन एक अनोखे आंदोलनही करण्यात आले होते. आमची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाहीये अशी भूमिका आंदोलनावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मांडली होती चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर आक्रोश मोर्चा नेत अनोखे आंदोलन छेडले होते.

मात्र त्यानंतरही शाळा बंद करण्यावर प्रशासन ठाम असल्याने विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकायचं नसून आम्ही दप्तर देऊन त्या बदल्यात बकऱ्या घेणार आहोत अशी भूमिका ठामपणे मांडली होती. काल झालेल्या अनोख्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे दरेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेने आंदोलन करणाऱ्यांसोबत चर्चा करून बुधवारपासून पुन्हा पूर्वीप्रमाणेच दरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले आहेत.

इगतपुरीच्या दरेवाडीपासून ३०० मीटर अंतरावर हायस्कूल तर ८०० मीटरवर प्राथमिक शाळा आहे. धरणामुळे विस्थापित नागरी वस्त्यांचे पुनर्वसन केले आहे. काही कुटुंबांनी मात्र स्थलांतर होण्यास नकार दिला होता. दरेवाडीतील मुलांसाठी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकाची नेमणूक केली होती. परंतु त्याठिकाणी शाळा मंजूर नाही शाळा मंजुरीचे अधिकार शासनाला असल्याने त्यामुळे तूर्त विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शिक्षक पाठविण्यात येणार आहे. तसेच लवकरच दरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देणार असल्याचं शिक्षण अधिकारी भास्कर कनोज यांनी सांगितले आहे.