आकर्षक गणेशमूर्ती मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी.

नाशिक:- देशभरात दरवर्षी गणेश उत्सव (ganesh festival)आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो. कोकणातील लोक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आठ दिवसांची सुट्टी घेऊन मोठ्या आनंदाने हा सण साजरा करत असतात. मुंबईचा लागबागचा राजा पुण्यातील दगडू शेठ हलवाई गणपती पाठोपाठ नाशिक मध्ये ही गणेशउत्सव मोठ्या आंनदीमय वातावरणात साजरा केला जातो. सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असताना नाशिकमध्ये वेगवेगळे गणेश मूर्ती बाजारात दाखल झाले आहेत.(nashik ganesh festival)

नाशिकच्या गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर(dongare vastigruh nashik )शंभरहून अधिक गणेश मूर्तींचे स्टॉल्स लागले आहेत. त्यामुळे गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या स्टॉल्सवर लालबागचा राजा, अष्टविनायक, दगडूशेठ हलवाई गणपती. अशा वेगवेगळ्या गणेश मूर्ती बाजारात आलेल्या आहेत. तसेच मूर्तीच्या वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख चढवण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील डोंगरे वासतिगृहाला आगळ्या – वेगळ्या प्रकारच रूप प्राप्त झाले आहे या ठिकाणावरील वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती यावेळी ग्राहकांच लक्ष वेधून घेत आहेत.

तसेच पोशाखातील गणेश मूर्तींना यावर्षी जास्त मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात होणारी होणारी गर्दी टाळण्यासाठी तयार मूर्ती घेण्यापेक्षा शाडूमतीची मूर्ती बनवून घेण्यावर अधिक भर ग्राहकांनी दिला आहे. दरम्यान दरवर्षी पेक्षा यंदा 25 ते 30 टक्के गणेश मूर्ती चे दर वाढल्याचे देखील व्यापाऱ्यांनी सांगितले.

यावर्षी नाशिक शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती बाजारात आल्या असल्या तरी गणेशउत्सव काळात डीजे वाजवण्यास मात्र आद्यपही परवानगी न मिळाल्यामुळे गणेश मंडळामध्ये नाराजी आसल्याचे बोलले जात आहे.