जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी; एक जण गंभीर जखमी

by : ऋतिक गणकवार

नाशिक : जमिनीच्या वादातून सख्खा भाऊ देखील वैरी होऊन जीवावर उठतो. अशीच एक घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील करंजगाव-सायखेडा परिसरात घडली आहे. जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी झाली असून यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सायखेडा पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले आणि आज हा प्रकार घडल्याचा आरोप जखमीने केला आहे. घटनेचा व्हीडीओ देखील समोर आला आहे.

तर घडलेली घटना अशी की, नाशिकच्या निफाड तालुक्यातील करंजगाव सायखेडा परिसरात दोन सख्ख्या भावांमध्ये वाद होता. या वादाचे रुपांतर काल हाणामारीत झाले. यात मोठ्या भावाने त्याच्या दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाला आणि त्यांच्या कुटुंबातील बायको व मुलीला देखील बेदम मारहाण केली. घटनेने परिसारत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या मारहाणीचा व्हीडीओ देखील समोर आला असून यात गंभीर स्वरुपाची मारहाण करताना दिसत आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गंभीर झालेल्या व्यक्तीने सांगितले, सायखेडा पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केला. त्यांनी वेळीच जर याप्रकरणात लक्ष घातले असते तर असा प्रकार घडला नसता.

गुन्हेगारी वाढतेय.

सध्या गुन्हेगारी प्रकरण वाढत आहेत. पोलिसांचा आता आता गुन्हेगारांमध्ये वचक राहिला नसून असे मारहाणीचे आणि दहशत पसरवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यावर आता पोलीस प्रशासनाला जाग येणे गरजेचे आहे. पोलिसांनी या प्रकरणाकडे देखील दुर्लक्ष केल्याचे यातील एक कुटुंब सदस्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.