आस्मानी गेले आता नाशकातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट!

by : ऋतिक गणकवार

नाशकातील शेतकरी बांधवांपुढील आस्मानी संकट आता कुठे गेले नाहीतर आता त्यांच्या शेतीमालावर भुरट्या चोरांची नजर पडलीय. सध्या बाजारात टोमॅटो हा तेजीत असून भुरटे चोर रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन टोमॅटो चोरत आहेत. या चोरीच्या घटना मखमलाबाद शिवारात घडत असून शेतकऱ्यांना या भुरट्या चोरांनी मेटाकुटीला आणले आहे. त्या मुळे त्रस्त शेतकऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र चोराचा काही सुगावा लागेना त्यामुळे शेतकऱ्यांची रात्रीची झोप उडाली आहे.


आस्मानी संकट गेले मात्र..

आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आला असून पुन्हा शेतकरी भीतीच्या सावटाखाली आलेला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या शेतमालचे नुकसान झाले होते. त्यात कसाबसा वाचविलेला शेतमाल दोन पैसे मिळवून देत असताना आता त्यावरच चोरटे डल्ला मारत आहे. त्या विशेष म्हणजे टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे पाहून भुरटे चोर रात्रीच्या वेळी टोमॅटो चोरी करत आहे.

टोमॅटो या शेतपिकाला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. मार्केटमध्ये ७०० ते ८०० रुपयांना प्रतिजाळी म्हणजेच कॅरेटला विकली जातेय. नाशिकच्या मखमालाबाद परिसरासह दिंडोरी, सिन्नर आणि पिंपळगाव परिसरात मोठ्या टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या परिसरात चोरांनी लक्ष केले आहे. टोमॅटो पीक सध्या काढणीला आले आहे. त्यात दिवसभर शेतकरी आणि शेतमंजूर हे टोमॅटो काढतात, आणि शेतातच टोमॅटोचे कॅरेट भरून ठेवतात, आणि पहाटे मालवाहतूक वाहनाने बाजार नेतात. अशी पद्धत ही सर्वत्र असते, यंदाच्या वर्षी शेतीमालाचे नुकसान झाल्याने टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे, आणि हीच संधी शोधून भुरटे चोर टोमॅटोची चोरी करत आहे. या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसंत असून या चोरीबाबत ज्ञानेश्वर पिंगळे, शंकर पिंगळे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अनेकदा याबाबत तक्रार देऊनही चोर हाती लागत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची रात्रीची झोप उडाली असून या चोरांच्या मुसक्या आवळण्याची वाट सर्व पाहत आहेत.