नाशिकमध्ये लिपिकाची हत्या ; बायको गावावरून येताच धक्कादायक बाब उघड

By : Pranita Borse

नाशिक : म्हसरूळ परिसरातून (Mhasrul area) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हसरूळ परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या मेरी वसाहतीत खून (Murder in Meri Colony of Water Resources Department) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या संजय वायकंडे याचा गळा आवळून खून झाल्याची माहिती मिळाली आहे. मेरी शासकीय वसाहतीत अशाप्रकारे खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संजय वायकंडे (Sanjay Vaikande) यांची गावी गेलेली पत्नी घरी परत आल्याने ही घटना उघडकीस आली. तर मृतदेहाचा शव विच्छेदन अहवाल प्राप्त होताच खून झाल्याचे निष्पन्न झाले ( in post-mortem report it has been concluded that it was a murder) आहे.

दिवाळी निमित्त गावी गेलेली पत्नी घरी आली अन पाहते तर काय…

संजय यांची पत्नी दिवाळी निमित्त गावी गेल्या होत्या. त्या गावावरुन घरी परतल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. नाशिकच्या दिंडोरी रोडवर असणाऱ्या मेरी वसाहतीत राहणाऱ्या संजय वायकंडे हे नाशिकच्या जलसंपदा विभागात क्लार्क म्हणून कार्यरत होते. संजय यांच्या पत्नी गावावरून आल्या त्यावेळेस संजय हे बेडरूम मध्ये पडलेले होते. दरम्यान संजय यांना अगोदर एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. खाजगी रुग्णालयातून त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आणि त्यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन समोर आल्यानंतर या अहवालात त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या घटनेने संपूर्ण मेरी – म्हसरूळ परिसरात खळबळ उडाली आहे. मेरीच्या शासकीय वसाहतीत असलेल्या घरी येऊन संजय यांची हत्या झाल्यानं अनेक शंका – कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहे. त्यामुळे परिसरात विविध चर्चा रंगल्या आहेत. तर हत्या कोणी आणि का केली याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही बाब घडली आहे. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने गुन्हेगारी घटनांच्या सत्रात भर टाकली आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासन यावर काय पाऊल उचलेल हे पाहणं महत्वाच ठरेल.