नऊ महिन्यांनी दिली आईची हत्येची कबुली, संगमनेरातील धक्कादायक प्रकार

संगमनेर:- नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात गणेश चतुर्थी च्या दिवशी ज्या मुलाने मैत्रिणीची हत्या केली होती. त्याच मुलाने पैशासाठी आपल्या जन्मदात्या आईची देखील हत्या केल्याची धक्कादायक बाब आता नऊ महिन्यानंतर समोर आली आहे. त्यामुळे एकाच आरोपीने दोन खून केल्याचे निष्पन्न झाले असून तशी कबुली त्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तुषार विठ्ठल वाळुंज असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. सखुबाई विठ्ठल वाळुंज असे तुषारच्या आईचे नाव आहे. आरोपी हा पूर्वी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून तो कधीकधी मानसिक संतुलन बिघडल्यासारखे करत असतो. तुषार वाळुंज यास अनेक व्यसने आहेत. त्यामुळे त्याच्याकडे आलेला पैसा त्याला पुरेसा नव्हता त्याची आई देखील रोजंदारी करून पैसे जमा करत होती. तुषारचे वडील काही वर्षांपूर्वी मयत झाले आहेत.

ते गवंडी काम करून आपला उदार निर्वाह करत होते. त्यानंतर तुषार कार दुरुस्ती शिकला आणि तुटपुंजे पैसे कमवत होता. मात्र व्यसनामुळे ते पैसे अपुरे पडत आसल्यामुळे आईकडे पैशांसाठी वारंवार मागणी करायचा जानेवारी महिन्यात त्याने आईकडे पैशाची मागणी केली. तेव्हा त्या माऊलीने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. त्याच दिवशी त्याने आईला रात्रीतून फाशी दिली नंतर मात्र या गुन्ह्यात आईचा मृत्यू हा आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आणि हा गुन्हा काही काळ पडद्या आड गेला.

अशी केली मैत्रिणीची हत्या

तुषार आणि निर्मला यांच्यात पूर्वीपासून मैत्री होती. ते एकमेकांच्या कायम संपर्कात होते त्यांना व्यसन देखील होते. तुषारने गणेश चतुर्थीच्या दिवशी निर्मला हिला गाडीवर घेतले आणि फिरण्यासाठी ते चांदनापुरी घाटात गेले तेथे जाऊन यांनी मद्य प्राशन केले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले तुषार तिला म्हणत होता की चल आपण डोंगरावर जाऊ मात्र निर्मला त्यास नाकार देत होती. तरी देखील त्याने तिला बळजबरी डोंगरावर नेले दोघे मध्याच्या नशेत असल्यामुळे तुषारणे एक मोठा दगड उचलला आणि तिच्या डोक्यात टाकला आणि निर्मलाचा जागीच मृत्यू झाला. हे जेव्हा तुषारच्या लक्षात आले तेव्हा तिचा चेहरा ओळखता येऊ नये म्हणून तिच्या डोक्याचा सेंदामेंदा केला त्यानंतर तो तिथून निघून आला. मात्र त्यास अटक करण्यात आली हा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक गवळी, पोलीस कॉन्स्टेबल कुरे व शिरसाट अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी केला.