कॉंग्रेसचे वादग्रस्त ट्वीट; RSS च्या चड्डीला आग लावल्याचा फोटो टाकला

देशात मोठ्या वादाला तोंड फुटले असून याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसने एक ट्वीट केले असून त्यात भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या यात्रेमुळे भाजपला मोठे नुकसान भोगावे लागणार, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील हाफ चड्डीचे एक छायाचित्र काँग्रेसने ट्विट केले असून या हाफचड्डीला आग लागल्याचे दिसत आहे. तसेच आता ‘फक्त145 दिवस’ असा इशाराही या ट्विटवर देण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजपने याविरुद्ध रान उठवले असून हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

भाजप नेते संबित पत्रा

भाजपा प्रवक्ते संबित पत्रा म्हणतात, काँग्रेसने जो फोटो ट्वीट केला आहे. तो संघ आणि भाजपचा प्रतिनिधित्व करणारा असून त्यांनी त्याला आग लावलेला दाखवले आहे. काँग्रेसने हे कृत्य लोकांना भडकवण्यासाठी केले असून कॉंग्रेसचे भारत जोडो यात्रा ही आग लावणे ही यात्रा आहे. आणि हे असे पहिल्यांदा नाही झाले, याधीही अश्या प्रकारचे फोटो काँग्रेसकडून टाकण्यात आले आहेत.

केद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

तर ज्यांनी देश तोडण्याचं काम केले, तेच अशा प्रकारच्या यात्रांचं आयोजन करत आहे, अशा शब्दात भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.

मंत्री जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेसला सुनावले

काँग्रेसच्या या ट्विटवर उत्तर प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम मंत्री जितिन प्रसाद यांची प्रतिक्रिया आली आहे. राजकीय मतभेद स्वाभाविक आणि समजण्याजोगे आहेत. मात्र राजकीय विरोधकांना जाळण्यासाठी अशा प्रकारची मानसिकता काय कामाची? नकारात्मकता आणि द्वेषाच्या राजकारणाची सर्वांनीच निंदा केली पाहिजे, अश्या शब्दांमध्ये मंत्री जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेसला सुनावले आहे.

कॉंग्रेसचे जयराम रमेश म्हणतात

भाजपने देशात दुफळी माजवल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. तर राहुल गांधी देशभरात यात्रेद्वारे भारतीयांची मने जोडण्याचे काम करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. भारत जोडो यात्र भाजपच्या विनाशकारी राजकारणाविरोधात आहे. एवढेच नाही तर स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी भारत जोडो यात्रा प्रभावी ठरेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद

कॉंग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेचा प्रारंभ केला असून त्या यात्रेला आता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून राहुल गांधी यांच्यासोबत लोक जोडले जात आहेत.