चित्रा वाघ यांच्याशी पंगा उर्फिला फायद्यात..?

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सुरु असलेला वाद शामण्याचे नाव घेत नाहीये. सध्या त्यांच्यात शाब्दिक युध्द सुरु आहे. तर आता दुसरीकडे चित्रा वाघ यांच्यानंतर उर्फी जावेद हिच्याविरोधात महिला संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत आणि ही विरोधाची बाजू सोडली तर या सर्व वादंगामुळे उर्फिच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

हटके कपड्यावरून उर्फी कायमच चर्चेत असते तर कधी टीकेची शिकारही बनते. टीका करणाऱ्यांना ती तिच्या शैलीत उत्तर देखील देते. दरम्यान आता तर तिने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी पंगा घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विचित्र कपड्यांवर एकीकडे वाद सुरु आहे, तर दुसरीकडे उर्फीच्या चाहत्यांची संख्या मात्र मोठ्या संख्येने वाढली आहे. उर्फीच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या वादाचा फायदा उर्फिला होताना दिसत आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात इन्स्टाग्रामवर उर्फीच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास ३ मिलियन होती. चित्रा वाघ यांच्या आक्षेपानंतर उर्फी जावेद हिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आता इन्स्टाग्रामवर उर्फीचे ४ मिलियन फॉलोअर्स आहेत. म्हणजे १ मिलियन ने तिच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदने सोशल मीडियावर अंग प्रदर्शन केल्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. ‘उर्फी जावेद रुपी होणारा स्त्री देहाचा बाजार रोखा’ अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे त्यांनी उर्फी जावेदला धारेवर धरले तर दुसरीकडे उर्फी ट्विटरवर त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि तिसरीकडे तिची फॉलोअर्स संख्या झटपट वाढली. या सर्व गोष्टी पहिल्या तर हा उर्फिचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हंटले जात आहे.

चित्रा वाघ यांनी संतप्त होत अभिनेत्री उर्फी जावेदला . ‘उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही, ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन असा थेट इशारा त्यांनी दिला होता. “आम्ही काय काम करतो, हे ऊर्फी सारख्या बाईला मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगानाच सुरू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अश्या शब्दांत तिला सुनावले. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या लोकांना हा नंगानाच दिसत नाही का?” असा सवाल त्यानी यावेळी केला होता. त्यानंतर त्यांच्यातील हा वाद शांत होत नाहीये. उर्फिचे फॉलोअर्स मात्र वाढत आहेत.