क्रिकेटर दीपक चहरच्या पत्नीची फसवणूक;जीवे मारण्याची धमकी

स्टार खेळाडू क्रिकेटर दीपक चहर याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती असून त्यांच्याकडून व्यवसायाच्या नावाखाली १० लाखांची रक्कम मागितल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

जया भारद्वाज यांच्या सोबत धोखाधडी झाली असल्याचे वृत्त असून त्यंना यातूनच जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी हैदराबाद क्रिकेट संघटनेचा माजी पदाधिकारी व त्याच्या मुलाने दिली आहे. या दोघांनी बिझनेसच्या नावाखाील जयाकडून १० लाखांची रक्कम घेतली होती. मात्र व्यवसाय सुरु झाल्यानंतर पैसे परत मागितले असता त्यांनी जीवे मारल्याची धमकी देत गैरवर्तनही केल्याचा आरोप आहे. दीपकच्या वडिलांच्यायाबाबत गुन्हा दाखल केला असून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

क्रिकेटर दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी सांगितले की, हैदराबाद स्टेट क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी आणि व्यावसायिक कमलेश पारीख आणि त्यांच्या मुलाने जयाची १० लाख रुपयांची फसवणूक केली. सोबतच सांगितले की, एमजी रोडवर असलेल्या पारिख स्पोर्ट्सचे मालक ध्रुव पारीख आणि त्याचे वडील कमलेश पारीख यांच्यात व्यवसायासंदर्भात गेल्या वर्षी चर्चा झाली होती.

ते पुढे सांगतात की, जया भारद्वाज यांनी ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांना विश्वासात घेऊन व्यवसायासाठी करार केला होता. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याच्या खात्यात दहा लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. ट्रस्टचा गैरवापर करून दोघांनीही फसवणूक केली. मागणी केल्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. क्रिकेटर दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.