नाशकात पुन्हा धाडसी दरोडा..! लाखोंचा ऐवज लुटला..

नाशकात जबरी दरोड्याच्या अनेक घटना घडल्या असून पुन्हा एकदा नाशकात जबरी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका घरात ८ जणांच्या टोळक्याने शिरून आई व मुलास मारहाण करत महिलेच्या अंगावरील दागिन्यांसह घरातील दागिने व रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना गुरुवारी (दि.24) सायंकाळी 7.30 च्या सुमारास सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे घडली आहे. घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दोरीने बांधून ठेवत घर लुटले

मुक्ताबाई ज्ञानेश्वर हुल्लुळे (वय ५०) व मुलगा राहुल ज्ञानेश्वर हुल्लुळे (वय ३२) हे घरात होते. सायंकाळी दोघे आपल्या घरातील हॉलमध्ये टीव्ही बघत असताना पुढील बाजूच्या दरवाजाने अचानक 8 जणांच्या टोळक्याने घरात प्रवेश केला. काही कळण्याच्या आत टोळक्याने हातात असलेल्या दोरीने मुक्ताबाई व राहुल यांना बांधून ठेवले. दोघांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. व घरातील ऐवज लुटून नेला.

पती घरात नव्हते

ज्ञानेश्वर कोंडाजी हुल्लुळे (रा.वडगाव पिंगळा, भवानी मंदिराजवळ) हे गुरुवारी टोमॅटो विक्रीसाठी मार्केटला गेले होते. घरात त्यांच्या पत्नी आणि मुलगा एकटेच होते. दोरीने मुक्ताबाई व राहुल यांना बांधून ठेवले. दोघांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मुक्ताबाई याच्या गळ्यातील व कानातील दागिने ओरबाडून घेतल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 20 हजारांची रोख रक्कम घेत दाराला बाहेरुन कडी लावून पळून गेले.

याप्रकरणी सिन्नर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडा पडल्याने परिसरात दहशत पसरली असून गाव व शेतात वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.