Home » शिवसेना कसली सावरकरांची वारसदार – फडणवीस

शिवसेना कसली सावरकरांची वारसदार – फडणवीस

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी
शिवसेना कसली सावरकरांची वारसदार, त्यांना लाज वाटली पाहिजे असा जोरदार टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.

ते नाशकात पत्रकारांशी बोलत होते. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ते नाशकात दाखल झाले होते. मात्र संमेलनाला जाणे देखील त्यांनी टाळले. या पार्श्वभूमीवर बोलतांना ते म्हणाले की आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचं योग्य सन्मान होणार नसेल तर तेथे जाऊन काय करायचे? असा उद्विग्न सवाल त्यांनी केला.

तर दुसरीकडे शिवसेनेवर आगपाखड केली. शिवसेनेवर बोलतांना ते म्हणाले की शिवसेना म्हणते आम्ही सावरकर वारसदार आहोत, अरे कसले वारसदार? दोन दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले, तेव्हा माफ़ी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असे शिवसेना सदस्य म्हणाले मग कशावरून शिवसेना सावरकरांची वारसदार असेल? असा खरमरीत सवाल त्यांनी केला.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!