पुन्हा दिलजमाई होणार? ठाकरेंचे आणि माझे शत्रुत्व नाही, असेल तर संपवावे लागेल : उपमुख्यमंत्री फडणवीस

पुन्हा एकदा दिलजमाई होण्यासाठी ठाकरे आणि फडणवीस एकमेकांकडे एक एक पाऊल पुढे सरकताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील तसेच काहीसे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे असो की, आदित्य ठाकरे आम्ही वैचारीक विरोधक आहोत पण शत्रू बिलकूल नाही. अलीकडे शत्रूत्व पाहायला मिळते ते संपवावे लागेल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात काहीशी खळबळ उडाली असून चर्चांना उधान आले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही. त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले होते, “देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे.” असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते.

यावर आता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आदित्य बोलताय हे खरे आहे, मी पण हेच वारंवार सांगितले. आम्ही वैचारीक विरोधक आहोत. शत्रू बिलकूल नाही. महाराष्ट्रात एक कल्चर आहे मी असे म्हणेल की, या कल्चरमध्ये आपण वैचारीक विरोधक असतो” अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.