‘ड्रायपोर्ट’ चा कायापालट होणार? लवकरच काम सुरू होण्याची चिन्ह…!

नाशिक:- नाशिक जिल्ह्यातून होणाऱ्या निर्यातीची दिशा बदलण्यासाठी निफाड येथील ‘ड्रायपोर्ट’ प्रकल्पाचा(dryport project) चा मार्ग आता मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी 2015 मध्ये निफाड येथे ‘ड्रायपोर्ट’ (nifad dryport)या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती.

या घोषणेनंतर सात वर्षे या प्रकल्पाबाबत कुठल्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. आता मुंबईतील पंडित जवाहरलाल नेहरू पोर्ट तथा(JNPT) कडून ‘ड्रायपोर्ट’ प्रकल्पासाठी 108 एकर जागेसाठी 108 कोटी 15 लाख 75 हजार रुपयांची रक्कम निफाड प्रांत कार्यालयाच्या( nifad prant office) खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

त्यामुळे आता ‘ड्रायपोर्ट’ प्रकल्पाला गती मिळणार आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये ‘ड्रायपोर्ट’ प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘ड्रायपोर्ट’ प्रकल्पबरोबरच लॉजिस्टीक पार्क ची ही उभारणी होणार…

‘ड्रायपोर्ट’ प्रकल्पाच्या जागी कस्टम पॅकेज, हँडलिंग या प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) येथे आज शिपमेंटकरिता जो वेळ जातो तो जाणार नाही.त्याशिवाय ड्रायपोर्टशी निगडित विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांची उभारणी होऊन इतर येणाऱ्या पुढील काळात उद्योगांनाही चालना मिळेल.

‘ड्रायपोर्ट’ च्या कामाचा महिनाभरात भूमिपूजन नारळ वाढवण्याचा अंदाज

ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्क व्हावे याकरता आग्रही भूमिका घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( centratl minister nitin gadkari) पुढील महिन्यात एका कार्यक्रमासाठी नाशिक शहरामध्ये येणार आहेत. त्यांच्याचं हस्ते या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ वाढवण्यात येईल अशी दाट शक्यता आहे..

‘ड्रायपोर्ट’ प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाल्यास कांदा,द्राक्षे, डाळिंब,भाजीपाल्यासह औद्योगिक उत्पादनाची निर्यात करणे सुलभ होईल ज्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचा ही वेग वाढेल आणि जिल्ह्याच्या अर्थकारणाची दिशा हा प्रकल्प बदलून टाकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस ‘ड्रायपोर्ट’ या महत्वकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली त्यावेळेस नितीन गडकरी भूपृष्ठ वाहतूक व जहाज या खात्याचे मंत्री होते. ‘ड्रायपोर्ट’ या महत्वकांक्षी प्रकल्पाचा नाशिक जिल्ह्यालाच नव्हे तर धुळे,जळगाव,नंदुरबार अहमदनगर, पुणे, या जिल्ह्यांनाही याचा फायदा होणार आहे.