अचानक आलेल्या पावसामुळे गणेश मंडळांची उडाली धांदल

नाशिक:- शुक्रवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे नाशिक शहरातील गणेश मंडळांची धावपळ झाली होती. गणेश उत्सवानिमित्त (ganesh festival) गणेश मंडळांनी आकर्षक सजावटी सह विविध देखावे साकारलेले आहेत. गणेशउत्सव काळात दररोज सायंकाळी हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. शुक्रवारी(friday rain) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे गणेश मंडळाची मोठी धावपळ झाल्याचे बघायला मिळाले. बाप्पांच्या भव्य मूर्तीचे तसेच देखाव्यांचे(ganesh murti decoration) पावसापासून बचाव करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धावपळ करावी लागली.

मुसळधार पावसामुळे शहरातील सारडा सर्कल, गंगापूर रोड, सिडको परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच रस्त्यावर साकारण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्ते देखील जलमय होऊन नदीनाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी एमजी रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेन रोड, शालीमार, मुंबई नाका, दही पूल, आशा विविध परिसरातील (mumbai naka)गणेश मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचाही मोठा हिरमोड झाला.

रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू आसल्यामुळे आकर्षक सजावट आणि देखावे बघण्यासाठी भाविकांची संख्या कमी झालेली दिसून आली. नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे मिनी केदारनाथ मंदिर उभारण्यात आले आसून नाशिक शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या अशोक स्तंभ येथे नाशिकचा मानाचा राजा या ठिकाणी उभारलेले आकर्षक देखावे बघण्यासाठी दररोज संध्याकाळी भाविकांची गर्दी होत असते. परंतु शहरात शुकवारी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भाविकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.

गेल्या महिन्याभरापासून सिडको, सातपूर, अंबड परिसरात विजेची समस्या कायम असतानाच आता त्यात गणेशोत्सवात विजेता लपंडाव सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता शुक्रवारी दुपारनंतर आलेल्या पावसामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने (power supply close)नागरिकांच्या संतापात भर पडली. अंबड औद्योगिक वसाहतीत गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा (stop electricity)खंडित होता. त्यात शुक्रवारी पुन्हा जोरदार पाऊस आणि बत्ती गुलमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.