देशभारत ईडीचे धाडीचे सत्र सुरूच होते त्यातून कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सुध्दा ईडीच्या चौकशीला समोरे जावे लागले, मात्र त्यानंतर देशातील काँग्रेस सोबतच राहुल गांधी सुद्धा कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसत आहेत आणि अश्यातच देशभर आंदोलन निदर्शने सुरू आहेत या एल्गारातच आता अशी माहिती मिळतीय की, राहूल गांधी आता तब्बल १६ दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यामुळे महाराष्ट्रात काय नवे राजकारण रंगते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी वारंवार चौकशी करत आहे. यानंतर देशभर काँग्रेस आक्रमक झाली आणि सर्वत्र आंदोलने निदर्शने केली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय सुरू असलेल्या तपासावरुन काँग्रेस आणि भाजप आमन-सामने आले आहेत. काँग्रेसकडून भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या कारवाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत हल्लाबोल करत आहेत.
यासर्व घडामोडीनंतर झोपलेली कोंग्रेस पुन्हा एका विरोधीपाक्षाच्या भूमिकेत ऍक्टिव्ह झाली असल्याचे दिसतेय. महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी रस्त्यापासून संसदेपर्यंत निदर्शने सुरू आहेत. राहुल – प्रियंका यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येणार आहे. प्रियंकाही काँग्रेस गांधी मुख्यालयात पोहोचल्या आहेत. दुसरीकडे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन स्तरांमध्ये बंदोबस्त लावला आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला आत प्रवेश दिला गेला नाही. दरम्यान, सोनिया, राहुल यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार काळे कपडे घालून सभागृहात आले आणि त्यांनी केंद्राच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
देशात राजकारणाचे असे पडसाद उमटले असतानाच राहुल गांधी हे महात्मा गांधी जयंतीपासून ‘भारत जोडो’ अभियानात देशभर पदयात्रा काढणार आहेत. त्यात ते महाराष्ट्रात १६ दिवस पदयात्रा करणार आहेत. ते प्रथमच महाराष्ट्रात तब्बल १६ दिवस दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधी हे महाराष्ट्रातील १५ विधानसभा मतदार संघातून जाणार असून या पदयात्रेत १० शहरांत सभा घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसला पुन्हा नवचैतन्य प्राप्त होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चे कोमेजलेले झाड पुन्हा एकदा बहरेल अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली आहे. देशात सुरू असलेला भाजप काँग्रेस अमना-सामना आणि राज्यात काँग्रेस पाठिंब्यावर स्थित असलेले ठाकरे सरकार कोसळले त्यानंतर राहुल गांधी राज्यात आल्यानंतर काय नवी समीकरणे घडतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.