Elon Musk : एलॉन मस्क यांच्या संपत्तीत घट, टेस्लाचे शेअर्स 10 टक्क्यांनी गडगडले

[ad_1]

Tesla Share Fell Down : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या लक्झरी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla) शेअर्स 10 टक्क्यांनी घटले आहेत. यामुळे मस्क यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली आहे. यामुळेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात 20.3 अब्ज डॉलरची घट झाली आहे. संपत्तीत घट झाल्यानंतर इलॉन मस्क आणि अर्नॉल्ट यांच्या निव्वळ संपत्तीमधील अंतर खूप कमी झालं आहे.

टेस्लाचे शेअर्स 10 टक्क्यांनी गडगडले

गुरुवारी टेस्ला इंक शेअर्समध्ये घसरण झाली आहे. याचा थेट परिणाम कंपनीचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीवर झाला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index), ही आतापर्यंतची सातवी सर्वात मोठी घसरण आहे. 20 जुलै रोजी, टेस्लाचे  शेअर्स सुमारे 10 टक्क्यांनी म्हणजेच 28.36 यूएस डॉलरने घसरले आणि 262.90 यूएस डॉलरवर बंद झाले. 

एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घट

एलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. याचा परिणाम एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीवर दिसून येत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट यांच्यातील संपत्तीतील फरक यामुळे आणखी कमी झाला आहे.  टेस्लाचे शेअर्स घसरल्यानंतरी मस्क यांची संपत्ती अरनॉल्टयांच्या तुलनेत सुमारे 33 अब्ज डॉलर अधिक आहे. फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट लक्झरी वस्तू कंपनी, LVMH Moët Hennessy चे सीईओ आहेत.

मस्क यांची एकूण संपत्ती 234.4 अब्ज डॉलरवर

टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचा थेट परिणाम एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर झाला आहे. यामुळे, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाने मस्क यांच्या एकूण कमाईमध्ये आतापर्यंतची सातवी मोठी घसरण झाल्याचं सांगितलं आहे. एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती आता 20.3 अब्ज डॉलरने घसरून 234.4 अब्ज डॉलर झाली आहे. असं असलं तरीही, एलॉन मस्क अजूनही जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत.

‘या’ अब्जाधीशांच्या संपत्तीतही घट

मस्क यांच्यासह ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीतील आणखीही अब्जाधीशांच्या संपत्तीतही घट झाली आहे. यामध्ये अमेझॉनचे जेफ बेझोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकेरबर्ग यांसारख्या अनेक अब्जाधीशांच्या नावांचाही समावेश आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अॅमेझॉनचे जेफ बेझोस, ओरॅकलचे लॅरी एलिसन, मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर, मेटा प्लॅटफॉर्मचे मार्क झुकेरबर्ग, अल्फाबेटचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन यांची एकूण संपत्ती 20.8 अब्ज डॉलर्सने म्हणजेट सुमारे 02.03 टक्क्यांनी कमी झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Car loan Information:
Calculate Car Loan EMI



[ad_2]

Source link