पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार!

आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला असून या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावरील हल्ल्याने पाकिस्तानात नव्हे जगात खळबळ उडाली आहे. इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आलेय. आज त्यांनी रॅली काढली होती दरम्यान वझिराबादमधील चौकात ही रॅली आली असता त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. हल्ल्यात एक मृत्युमुखी पडला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘लॉंग मार्च’ रॅलीचे

पाकिस्तानी सरकारच्या विरोधात इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा ‘लॉंग मार्च’चे आयोजन केले आहे. लाँग मार्चच्या माध्यमातून इम्रान खान यांनी सरकारविरोधात मोर्चा खोलला असून देशातील निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. आज हा मोर्चा गुजरानवाला या ठिकाणी आला होता. 

एक हल्लेखोर अटकेत

इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे समोर आले असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जगात खळबळ उडाली आहे.