अवघ्या तीन दिवसांत लाडक्या बाप्पाला निरोप; नाशिक पोलिसांचीही विशेष तयारी

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सज्ज झाले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरून आज नाशिक पोलिसांनकडून सशस्त्र संचलन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नाशिक शहर पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज भद्रकाली पोलीस ठाण्यापासून या संचालनाला सुरुवात झाली. पुढे भद्रकाली, मेन रोड, एम जी रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा आदी भागातून पोलिसांनी संचलन केले. ज्यात वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, शीघ्र कृती दल, कमांडो, सहभागी झाले होते.
तब्बल दोन वर्षानंतर शहरात गणेशाचे आगमन मोठ्या थाटामाटात झालं. तसंच आता गणेश विसर्जनामध्येही कुठलंही विघ्न येऊ नये आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

डीजेमुक्त गणेशोत्सवाला मंडळे व तालमींचा प्रतिसाद मिळू लागला आहे. मिरवणुकीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी पोलिस प्रशासन दक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आज भद्रकाली पोलीस ठाण्यापासून पोलिस संचलनास प्रारंभ झाला आहे. या वर्षी कोरोना संसर्ग हद्दपार झाल्याने श्रीगणेशाच्या उत्सवावर कोणतेही प्रशासकीय बंधणे नसल्याने युवा वर्गात प्रचंड उत्साह आहे. अशात विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये याची पुरेपुर काळजी प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं चित्र शहरातील भद्रकाली, मेन रोड, एमजी रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा या भागातून झालेल्या पोलीस संचलनाच्या माध्यमातून दिसून येत आहे.

विसर्जनाची ठिकाणे निश्चित

पोलिस प्रशासनासह नाशिक मनपा प्रशासन देखील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर तयारीत आहे. गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर नाशिक मनपा प्रशासन गणेश विसर्जनाच्या (Ganesh Immersion) जोरदार तयारीला लागले असून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (NMC commissioner) यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सहा विभागात गणेश विसर्जन ठिकाणी विविध कामे पूर्ण केली जात आहेत. देवळाली गावात (Deolali Camp) गणेश विसर्जन ठिकाणी जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान यंदा मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता शहरात ७१ ठिकाणे निश्चित झाली आहेत.

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही सुरु

तब्बल दोन वर्षानंतर शहरात गणेशाचे (Ganesh) आगमन मोठ्या थाटामाटात झाले. तसेच दीड दिवसांचे गणेशाचे विसर्जनही करण्यात आले. यानंतर दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नाशिक मनपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवाय रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही सुरु आहे. तसेच मिरवणुकीच्या मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच बांधकाम विभागाकडून डांबर आणि खडीच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्णत्वास गेल्यावर आता गणेश विसर्जन ठिकाणी कामे केली जात असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.