टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत…

नाशिक:- मागील महिन्यात टोमॅटोला सोन्यासारखा दर मिळत होता परंतु केंद्र सरकारने टोमॅटो आयात केल्याने पुन्हा टोमॅटोचे भाव कोसळले आहे. अचानक टोमॅटोचे दर कोसळ्याने शेतकरी पुन्हा आडचणी सापडला आहे.

काबाडकष्ट करून पिकवलेला टोमॅटो हाता तोंडाशी आला आसताना दर घसरले आहे. त्यामुळे नाफेड मार्फत टोमॅटोला 50 रुपये भाव देऊन खरेदी करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली आहे. वीस कीलोच्या टोमॅटो कॅरेटला फक्त 150 ते 250 रुपये दर मिळत आहेत. टोमॅटो काही दिवसांपूर्वी याच 20 किलो टोमॅटोच्या कॅरेटला तब्बल अडीच हजार ते तीन हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र अचानक टोमॅटोची दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. काबाड कष्ट करून पिकावलेला माल कवडीमोल भावात विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. कुठलेही पीक घेतांना शेतकऱ्याला प्रचंड मेहनत करावी लागते पीक चांगले आल्यास त्याला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी कष्ट करून उत्तम प्रकारे पीक आणत आसतो बहुदा भांडवल नसल्यामुळे तो विविध बॅंक, पतसंस्था, खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन पोटच्या मुलाप्रमाणे पीक आणतो.

परंतु त्याने कष्ट करून पिकवलेल्या मालाला जर कवडी मोल भाव मिळत असेल तर त्याच्यापुढे आत्महत्या शिवाय पर्याय उरत नाही. एकीकाडे शेतकरी आत्महत्या वाढत आहे आणि दुसरीकडे राज्यासरकार हे संगत की हे सर्वसामान्यांच,शेतकऱ्यांच सरकार आहे. ज्या सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात ते खरच सर्वसामान्यांच सरकार म्हणायच का हा प्रश्न आहे.