काजल शिंगलावर एफआयआर पण आयोजकांवर कारवाई कधी? – माकपचा सवाल

१२ मार्च २०२३ रोजी मीरा रोड येथील एसके स्टोन मैदानावर आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या एका सार्वजनिक मेळाव्यात मीरा-भाईंदरच्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाविरुद्ध गुजरातच्या काजल शिंगला उर्फ हिंदुस्थानी यांनी द्वेषयुक्त भाषण केले होते.

भाषणात काजल हिने मीरा रोडला अमली पदार्थांचा अड्डा, मुस्लिम फेरीवाले नपुंसकतेची औषधे मिसळून वस्तु विकत असल्याचा दावा तसच इथे लव जेहाद व लँड जेहाद सुरू असल्याचा आरोप केला होता. चादर वाला व फादर वाला शब्द वापरुन तिने मुस्लीम व ख्रिस्ती अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले. या प्रक्षोभक मोर्चा व भाषणामुळे मीरा-भाईंदर परिसरात एकाच संतापाची लाट उसळली.

द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांवर तसेच ‘जन आक्रोश मोर्चा’च्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सादिक बाशा, आपचे सुखदेव बनबंसी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे सॅबी फर्नांडिस आदींच्या नेतृत्वात पोलिस आयुक्तांना भेटून शिष्टमंडळाने केली गेली.

मीरा भाईंदर परिसरात शांतता व जातीय एकात्मता भंग करणारे भाषण देणार्‍या काजल हिच्यावर स्थानिक पोलिसांनी भादंविच्या कलम 153 (अ) आणि 505(2) अंतर्गत गुन्हा नोंद केला गेला आहे. याचे माकपकडून स्वागत करण्यात आले आहे.

परंतु शिवप्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना आणि सनातन संस्था यासारख्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन सकल हिंदू समाज नावाच्या बॅनरखाली राज्यभरात भडकाऊ मोर्चे काढले. या सर्व मोर्च्यांना भाजप नेत्यांचा भरपूर सहभाग आणि पाठिंबा राहिला. मात्र आयोजकांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.

म्हणून आपल्या अजून आयोजक संघटना, भाजप व आमदार गीता जैन, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता, भाजपचे नगरसेवक रवी व्यास आणि मनसे नेते सानिप राणे आणि सानिप राणे आणि शिवसेना नेते शैलेश पांडे यांच्यावर देखील गुन्हा नोंद करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. यासाठी पुढे पाठपुरावा करण्यात येइल.

डीवायएफआय, हक है, निर्भय भारत, मीरा-भाईंदर विकास मंडळ, जिद्दी मराठा, ऑल इंडिया लॉंयर्स यूनियन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एमबीपीएस, पहल फाउंडेशन, तिरछी आंख साप्ताहिक या संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकर्‍यांसाह अनेक नागरिकांची सही होती.

मोईन अन्सार                                सादिक बाशा (9867414799)

सचिव, माकप, मीरा भाईंदर युनिट        काशीमिरा, शाखा सचिव, माकप