नाशकात अग्नितांडव! ८ ते १० भंगाराचे दुकाने जाळून खाक..

नाशिक शहरात पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. शहरातील अंबड परिसरात (In Ambad area) असलेले चुंचाळे घरकुल योजनेच्या जवळच एका भंगार दुकानाला पहाटे ३ च्या सुमारास आग (Scrap shop fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने सर्वच भस्मसात गेले आहे. नाशिकमध्ये आगीच्या घटना वाढताना (Fire incidents are increasing in Nashik) दिसत आहेत. पहाटे ३ च्या सुमारास चुंचाळे घरकुल योजनेच्या जवळ असलेल्या भंगार दुकानाला आग लागली असून आगीचे स्वरूप मोठे होते. परिसरात उंच उचं धुराचे आणि आगीचे लोट जात होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल तत्काळ हजार झाले, त्यांच्याकडून युद्धपातळीवर ही आग विझवण्यात आली आहे. ही आग कशी लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये.

पहा फोटो..

याबाबत अधिकची माहिती अशी की, आज पहाटे ३ च्या सुमारास अंबड परिसरातील चुंचाळे घरकुल योजनेच्या जवळ असलेल्या भंगार दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी जवळपास ८ ते १० दुकाने जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चुंचाळे परिसरात सुमारे 25 ते 30 भंगारची दुकाने आहेत. या घटनेची माहिती समजताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. अंबड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही आग का लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नुकतेच बर्निग टेम्पोचे थरार नाशिकरांनी अनुभवले आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर जीवित हानी तसेच आर्थिक नुकसान देखील होत असते, त्यामुळे याकडे गांभीर्याने बघण्याची गरज असून यावर काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच आपण आपली काळजी घेण्याची गरज आहे.