नाशिकच्या ‘या’ भागात ३ बिबट्यांचा मुक्तसंचार! वनविभागाची मोहीम सुरु; एकास केले जेरबंद

नाशिक : येथील पळसे गावी एक ते दीड वर्षाचा नर जातीचा एक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गावात आणखी २ बिबट्यांचा वावर असून त्यांनी गुरुवारी (दि. १२) एका वासराला गंभीर जखमी केले होते. यामुळे गावकरी या बिबट्यांच्या जबर दहशतीत आहे. गावात ३ बिबट्यांचा वावर होता मात्र वनविभागाच्या प्रयत्नानंतर एकाला पकडण्यात यश आले आहे. मात्र अजूनही २ बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याने गावकरी दहशतीतच आहेत त्यामुळे वनविभागाचे अधिकारी अजूनही युद्धपातळीवर धर-पकड मोहीम राबवत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितनुसार, पळसे येथील बंगाली बाबा, गायखे मळा या परिसरात मागील काही दिवसांपासून तीन बिबट्यांचा वावर होता. हे बिबटे रोज सायंकाळी नागरिकांना मुक्त संचार करताना दिसून येत होते. बिबट्या अश्याप्रकारे मुक्त फिरत असल्याने त्यामुळे पळसे नागरिक, शेतकरी भयभीत झाले. बिबट्या दिसल्याला अतिशय भयानक होते.

त्यातच गुरुवारी (दि. १२) परिसरातील रहिवासी शिवाजी गायखे यांचे वासरू बिबट्याने गंभीर जखमी केले होते. नागरिकांच्या प्रसंगावधानाने सदर वासरूचे प्राण वाचले मात्र गावकऱ्यांच्या मनात या बिबट्यांची जबर भीती बसली. पोलीस पाटील पळसे, सुनिल गायधनी यांच्या विनंती नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक प्रादेशिक यांचे मार्गदर्शनाखाली पिंजरा लावण्यात आला आहे.

त्या पिंजऱ्यात एक ते दीड वर्षाचा नर जातीचा एक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गावात आणखी २ बिबट्यांचा वावर असून या बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याने गावकरी दहशतीतच आहेत त्यामुळे वनविभागाचे अधिकारी अजूनही युद्धपातळीवर धर-पकड मोहीम राबवत आहेत.