आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद.

नाशिक :केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्के जाहीर झाल्याच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीचे नाशिक जिल्ह्यातील सर सर्व बाजार समित्या बेमुदत बंद झाल्या असून लासलगाव बाजार समितीच्या आवारावर आज सोमवारी एकही ट्रॅक्टर सकाळपासून दिसला नाही. आज लीलाव बंद राहिल्याने किमान दोन ते तीन कोटी रुपयांचा आर्थिक उलाढाल बंद राहणार आहे . सर्व व्यापारी वर्ग बेमुदत बंद साठी ठाम असल्याने या लिलाव बंदची कोंडी कशी फुटणार ही प्रशासनापुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवले असल्याची माहिती नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली.

Read Also : कांदा दरवाढीच्या भीतीने निर्यातीवर ४०% शुल्क, शेतकऱ्यांत संतापाची लाट

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी व निर्यातदार यांची लासलगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सदरचा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याने जर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आली तर ते लिलाव काढून त्यानंतर बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांच्या विनंतीनुसार सदरचा बेमुदत बंद चा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला असून या मीटिंगची कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे,सोहनलाल भंडारी,नीतीन ठक्कर,नितीन जैन,मनोज जैन,नंदकुमार डागा,नंदकुमार अट्टल,रिकबचंद ललवाणी, नितीन कदम,भिका कोतकर,रामराव सूर्यवंशी,दिनेश देवरे,पंकज ओस्तवाल जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.