नाशकात टोळक्याचा धुडगूस; घरात घुसून साहित्याची तोडफोड

नाशिक : नाशिकरोड येथील गोरेवाडी परिसरात चार जणांच्या टोळक्याने एका महिलेच्या घरात घुसून घरातील साहित्याची आणि सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले आहे. तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाची तोडफोड करत हे टोळके फरार झाले आहे. याप्रकरणी या महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संशयित आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी महिलेच्या घरात घुसून घरातील पंखा, फ्रिज, टीव्ही आणि बाथरूमच्या दरवाजाचे याची दांडुक्याच्या साहाय्याने तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर या टोळक्याने बाहेर येऊन घरासमोर पार्क केलेल्या रिक्षाची काच फोडून हे टोळके फरार झाले.

याप्रकरणी संशयित आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

संशयित या परिसरात दुचाकी वरून येतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. संशयित आणि त्याचे साथीदार या ठिकाणी दुचाकीवरून येताना दिसत आहे. तर त्यांनी रिक्षाची केलेली तोडफोड या ठिकाणी कॅमेरात कैद झाली आहे.

नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी या ठिकाणी घडलेली ही घटना आहे. चार जणांच्या टोळक्याने महिलेच्या घरात घुसून घरातील साहित्याची आणि सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले आहे. बाथरूमचा दरवाजा, खिडक्या घरातलं काचीचे साहित्य आणि इतर सर्व सामान घरात बिथरलेले होते.

घरात धुडगूस घातल्यानंतर टोळक्याने घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाची तोडफोड केली आणि टोळके फरार झाले आहे. याप्रकरणी या महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिलेच्या घरात घुसून या चौघांनी घरातील पंखा, फ्रिज, टीव्ही आणि बाथरूमचा दरवाजाचा आणि इतरही काही जीवनावश्यक वस्तूंची दांडुक्याच्या साहाय्याने तोडफोड केली आहे. या घटनेत घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याप्रकरणी संशयित आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.